GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

CiViLSENSE Social Foundation · GoBiz TechWorks LLP चा सामाजिक उपक्रम

समाजासाठी अभियांत्रिकी

अभियांत्रिकीचे ज्ञान फक्त कार्यालये आणि फायलींपुरते राहू नये. या उपक्रमातून अभियंते आपले ज्ञान विद्यार्थी आणि समाजापर्यंत पोहोचवतात — सुरुवात पाण्यापासून.

तुमच्या घरात रोज किती पाणी वापरले जाते, माहीत आहे?

पाणी सगळेच वापरतात, पण त्याचा हिशेब फार थोडे ठेवतात. घर, शाळा, गाव — छोट्या सवयींचा एकत्रित परिणाम किती मोठा असतो, हे अभियंते रोज पाहतात. हीच जाण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्रयत्न.

सुरू

शाळांमध्ये पाणी जनजागृती

पुणे आणि परिसरातील गावांमधील इयत्ता 7 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक सत्रे — पाणीबचत आणि water footprint (जलपदचिन्ह) म्हणजे अन्न, कपडे आणि रोजच्या वस्तूंमागे दडलेले पाणी.

सत्राची पद्धत: मराठीतून, सोप्या भाषेत, प्रत्यक्ष उदाहरणे आणि छोट्या कृतींसह.

शाळांमधील सत्रे विनामूल्य आहेत.

तुमच्या शाळेत सत्र आयोजित करा

विद्यार्थी काय शिकतात

  1. एका कुटुंबाला प्रत्यक्षात किती पाणी लागते
  2. रोजच्या वस्तूंमागे दडलेले पाणी
  3. घर आणि शाळेसाठी पाणीबचतीच्या सोप्या सवयी

कार्यक्षेत्रे

  • सुरू

    पाणी जनजागृती

    विद्यार्थी आणि समाजासाठी पाणीबचत व water footprint.

  • लवकरच

    अभियांत्रिकी जनजागृती

    अभियंते काय करतात आणि त्या क्षेत्रात कसे पोहोचायचे, हे विद्यार्थ्यांना समजावणे.

  • लवकरच

    समाजहितासाठी AI

    सार्वजनिक आणि सामाजिक गरजांसाठी सोपे तंत्रज्ञान.

सहभागी व्हा

तुम्ही अभियंता, शिक्षक आहात किंवा पाण्याविषयी आस्था असलेल्या संस्थेत काम करता? स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आमच्यासोबत सहकार्य करा.